पुणे, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे शनिवारी भूमिपूजन होत असून या समारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी तयारीची पाहणी केली. खासदार संजय काकडे, पोलीसआयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, खासदार संजय काकडे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील पटांगणात हा समारंभ होणार असून नागरिकांना बसण्यासाठी ३५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या बाजूस भारतीय बैठकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सहा मोठे स्क्रीन्स लावण्यात आले असून बाहेरच्या बाजूसही ४ स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. तीन किलोमीटर पर्यंत आवज ऐकू जाईल असे ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. आठ ते दहा हजार वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी मुंबईतील कार्यक्रमानंतर ६.३५ पर्यंत येथे येणार असून ६.४० ला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमानंतर ८ वाजता मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अशी माहिती बापट यांनी यावेळी दिली.

Post a Comment