भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) सध्या ज्या संकाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहता सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नसल्याचे विधान ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय बीसीसीआयसमोर नसल्याचेही ते शुक्रवारी म्हणाले. येत्या ३ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाची सुनावणी होणार आहे. एका कुस्ती लीगच्या प्रमोशनल कार्यक्रमात अनुराग ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाले की, सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नसल्याची कल्पना आम्हाला आहे, पण प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निकाल येईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. बीसीसीआय सध्या संकटाशी सामना करत आहे आणि ३ जानेवारीपर्यंतच्या सुनावणीपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
Post a Comment