आऊट इन्कमिंगचे सत्र कायम

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे पालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच आजी माजी तसेच पक्षातील दिग्ग्ज नगरसेवक पक्षाला घटस्फोट देऊन दुसऱ्या पक्षात राजकीय संसार थाटत आहेत. आज मनसेचे स्थायी समिती सदस्य चेतन कदम, शिवसेनेचे नगरसेवक दिपक घाडीगावकर आणि अपक्ष मकरंद नार्वेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला.
पालिकेची आगामी निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यानच काही दिग्ग्ज नेत्यांनी पक्षाला अलविदा करण्याचा विडा उचलला आहे. पालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्याना वेठीस धरणारे माजी विरोधीपक्षनेते तसेच गुरुदास कामतांचे खंदे समर्थक देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसमधील अमराठी लोकांची हुकूमशाही आणि मराठी माणसांवर होत असल्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकला असल्याचे सांगितले. तर, काँगेसच्या आक्रमक नगरसेविका वकारउन्नीसा यांना तिकीट मिळणार नसल्यामुळे एमआयएमचा नारा लावायला सुरुवात केली. तसेच, महाराष्ट्राच्या राजकारणात इंजिन वेगाने चालत नसल्यामुळे मनसेचे स्थायी समिती सदस्य चेतन कदम यांनी इंजिनाचा प्रवास थांबवत शिवसेनेत आज प्रवेश केला. तर शिवसेनेचे नगरसेवक दीपक घाडीगांवकर यांनी यंदाच्या निवडणुकीत इंजिनाच्या प्रवासाला अधिक पसंती देत शिवसेनेला अलविदा केला आहे. तसेच, 227 या प्रभागातून अपक्ष निवडून आलेले मकरंद नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मागच्या निवडणुकीत सत्तास्थापनेवेळी शिवसेनेला पाठींबा दिला होता. पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 3 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. यामुळेच, येत्या काही दिवसांत किती नगरसेवक स्वतःच्या पक्षाला रामराम करणार आणि कितीजण नव्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन गुलाल उधळणार हे चित्र मुंबईत लवकरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget