टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना बिग बॉस या रिअँलिटी शोमुळे काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीस आली होती. तिने नच बलिए, लव स्कूल, नागार्जुन एक योद्धा अशा मालिकेत काम केले आहे. करिश्माने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी फक्त चित्रपटाच्या शोधात नसून मी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. मग ती चांगली भूमिका छोट्या पडद्यावर असली तरी मी काम करण्यास तयार असल्याचे ती म्हणाली. सध्या करिश्माला रोमॅण्टिक भूमिका साकारायची असल्याची तिच्या मनातील इच्छा तिने या वेळी बोलून दाखवली. करिश्माला सर्वात जास्त प्रसिद्धी रिअँलिटी शो बिग बॉसमुळेच मिळाली होती. याच रिअँलिटी शोदरम्यान तिची ओळख मॉडेल उपेन पटेलशी झाली. शोमध्ये दोघांनी एकमेकांना होकार दिला. या दोघांनी शोमधून बाहेर आल्यावर लग्न बंधनात अडकण्याचा निर्णयदेखील घेतला होता; परंतु काही दिवसांनीच त्यांच्यात वाद होऊन लागले. आता या दोघांचा ब्रेकअप झाला असल्याची कबुली करिश्माने काही महिन्यांपूर्वीच दिली. त्या वेळी ती म्हणाली होती की, आमच्या नात्याचा पाया भक्कम होता; पण काही गोष्टी मनाविरुद्ध होत गेल्या. हे एक नाते सोडून लगेचच दुसर्या नात्यात गुंतण्याचा आमचा विचार नसला तरी या नात्यात आम्ही वेगळे होण्याचाच निर्णय घेतला आहे. करिश्मा लवकरच बिग मेमसाब या रिअँलिटी शोमध्ये नृत्य समीक्षण करताना दिसणार आहे.
Post a Comment