मुंबई : महापालिकेतील एका कार्यकारी अभियंत्याने पदोन्नती मिळवण्यासाठी खोटी डिग्री दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असतानाच त्यांना सेवेतून काढून टाकण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने केली आहे. बुधवारी होणार्या स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.
संबंधित अभियंता मागील ३0 वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत आहेत. २६ एप्रिल २0१३ पासून ते कार्यकारी अभियंता (स्थापत्य) परिमंडळ ६ (पूर्व उपनगरे) या पदावर कार्यरत आहेत. ३ फेब्रुवारी २0१४ रोजी त्यांनी उप प्रमुख अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत बुंदेलखंड विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र बुंदेलखंड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी, झाशी येथे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी पाठय़क्रम नसताना त्यांनी तिथे हा पाठय़क्रम असल्याचा व अँडमिशन घेतल्याचे बनावट कागदपत्रे दाखल केली. पदोन्नती समितीच्या छाननीत त्यांनी सादर केलेली डिग्री खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना कारणो दाखवा नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. तसेच त्यांना निलंबित करून खातेअंतर्गत चौकशीही करण्यात आली. मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

Post a Comment