काँग्रेसमध्ये संजय निरुपम - गुरुदास कामत गटामध्ये वाद -
काँग्रेस मधून आउट गोइंग मोठ्या प्रमाणात सुरु -
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी वाढल्याने माजी खासदार गुरुदास कामत नाराज झाल्यानंतर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राइन यांनी आपल्या 4500 कार्यकर्त्यांसह राजीनामा दिल्याने कॉंग्रेसचा अल्पसंख्यांक विभाग बंद झाला आहे. अल्पसंख्यांक विभाग बंद झाल्यानंतर कॉंग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका वखारूनिस्सा अंसारी यांच्या वार्डमधून माजी विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांच्या मुलीला तिकिट दिले जात असल्याने अंसारी यांनी पदाचा व सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अंसारी यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे.
वखारुनिस्सा अन्सारी यांनी जनता दल, समाजवादी पक्ष व कॉंग्रेसमधून 4 वेळा नगरसेवकपद भूषविले आहे. परंतू 2017 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी भेटणार नसल्याने अंसारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्या नंतर एमआयएमचे काम करत राहणार असून तिकिट द्यायचे की नाही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. येत्या निवडणुकीमध्ये एमआयएमचे नगरसेवक मोठ्या संखेने जिंकुन आणण्यासाठी प्रयत्न करू असे अंसारी यांनी सांगितले.दरम्यान महापालिका निवडणुक तोंडावर आली असताना उमेदवारांची यादी जाहिर करण्यास विलंब होत आहे. यामुले आपल्याला तिकिट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने अंसारी यांच्या नंतर अनेक नगरसेवक, कार्यकर्ते आपल्या पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

Post a Comment