पालिका निवडणुक अमावस्या मुळे पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली, मात्र अमावस्या असल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक गेला. दरम्यान महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोईकरिता रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांनी अमावस्याला प्रारंभ झाला ती शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटापर्यंत होती. त्यामुळे अमावस्याचा फटक्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर केला नसल्याचे बोलले जाते. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानेही आज अमावस्या असल्याने अर्ज भरण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केलं. यंदा पालिका निवडणुकीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे तरीसुद्धा अनेकांना अर्ज भरण्याबाबत सभ्रम असल्याचे समजते. क आयोगाने ११ जानेवारी रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी २९ जानेवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु उमेदवारांच्या सोईसाठी आता येत्या रविवारीदेखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी म्हणजेच २९ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारली जाणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले होते. मात्र, आता येत्या रविवारीदेखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी १ ते ६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीतील रविवारीसुद्धा (५ फेब्रुवारी २०१७) उमेदवारी अर्ज स्वीकारली जाणार आहेत, अशी माहितीही सहारिया यांनी दिली. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मुंबईत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget