येत्या रविवारी संपूर्ण मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – येत्या रविवार संपूर्ण पालिका क्षेत्रात विशेष राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयाच्या सुमारे ११ लाख बालकांना ४ हजार ८०० तात्पुरत्या लसीकरण केंद्रांमार्फत पोलिओची मोफत लस पाजण्यात येणार आहे.
तसेच रविवार, ज्या बालकांना पोलिओचा डोस मिळालेला नाही, त्यांना दिनांक ३० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी, २०१७ या दिवसांदरम्यान त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यात येईल. त्यासाठी अंदाजे ५००० लसीकरण चमू असतील. दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत १० लाख ८३ हजार ४०८ बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली होती तरी सर्व सुजाण पालकांना पालिका प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रिय सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व पोलिओ उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संभाव्य पोलिओपासून संरक्षण करावे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget