कामतांचे खंदे समर्थक देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत

मुंबई, रविवार (प्रतिनिधी)- पालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्याना वेठीस धरणारे माजी विरोधीपक्षनेते तसेच गुरुदास कामतांचे खंदे समर्थक देवेंद्र आंबेरकर यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसमधील अमराठी लोकांची हुकूमशाही आणि मराठी माणसांवर होत असल्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकला, असे आंबेरकर म्हणाले.
मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्या हुकूमशाहीला अनेक कार्यकर्ते कंटाळले आहेत. तसेच निरुपम आणि गुरुदास कामात यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांना आपल्याला तिकीट मिळेल कि नाही याची शाश्वती नसल्याने अनेकांनी काँग्रेसला रामराम केला आहे. काँग्रेस सोडणाऱ्यांमध्ये माजी विरोधी पक्ष नेते आणि कामत समर्थक देवेंद्र आंबेरकर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. पाच वर्षांपूवी अंधेरी पश्चिम येथील आंबोली हिल मतदारसंघातून निवडून आलेले देवेंद्र आंबेरकर हे काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते होते. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांना दोन वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद दिले गेले तेव्हा काँग्रेसच्या दोन गटातील धुसफुस बाहेर पडली होती. तसेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देऊन लढवले जाणार होते. परंतू आंबेरकर यांनी या प्रस्तावाला विरोध करत दुसऱ्या वॉर्ड मधून उमेदवारी मागितली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेपासून गुरुदास कामत लांब राहणार असल्याने त्यांना मानणाऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्याना निवडणुकीची तिकिटे मिळण्याची शक्यता नसल्याने येणाऱ्या काळात आणखी काही जण काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आह

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget