मुंबई - सावकारी कर्ज न फेडल्याचे निमित्त करून जातीय द्वेषापोटी बायको मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून बेकायदेशीररित्या संपत्ती ताब्यात घेतल्याने उपासमार होत असल्याने उपोषण करत असल्याची माहिती सहदेव ननावरे यांनी दिली. दरम्यान उपोषणामुले ननावरे यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ननावरे हे एक वडार समाजातील व्यावसायिक कंत्राटदार आहेत. साई कंस्ट्रकशन नावाने ते कंत्राट घेतात. ननावरे यानी पुण्यातील तळेगांव दाभाडे येथील राष्टवादीचे गणेश खांडगे व इतर सहा लोकांकडून 2013 मध्ये एक कोटी दहा लाख रुपये 5 टक्के दराने व्याजाने पैसे घेतले होते. सन 2013 पासून 2016 पर्यंत प्रतिमहा दहा लाख रुपये चेक द्वारे व्याजाची रक्कम परत केली. परंतू काही कारणात्सव दोन हफ्ते न दिल्याने खांडगे व इतरानी बायको सरस्वती व मुलाला धाक दाखवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत घरातून बाहेर काढले आहे. घराला व ऑफिसला कुलुप लावण्यात आले असल्याने 16 जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण करत असल्याचे ननावरे यांनी सांगितले.
राष्टवादीचे गणेश खांडगे व इतर सहा लोकांकडून झालेल्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकड़े तक्रार केल्यावर आरपीआय (ए) चे उपाध्यक्ष बाबुराव शेजवळ यांनी उपोषण ठिकाणी भेट देवून पुण्याच्या पोलिसांशी संपर्क साधला असता ननावरे याना न्याय देवू असे आश्वासन दिले आहे. उपोषणामुळे ननावरे यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना पोलिसांमार्फत जीटी रूग्णालयात दाखल केले असल्याने त्यांच्या पत्नी व मुलाला घेऊन मुख्यमंत्र्यांशी साधला जाईल व त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे शेजवळ यांनी सांगितले. a
Post a Comment