राज्यात रिपाइंची भाजपशी युती : रिपाइंला मुंबईत हव्यात ४५ जागा

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – राज्यातील दहा महापालिका निवडणुका रिपाइं (आठवले गट) भाजपसोबत लढणार असून, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपाइंला ४५ जागाची मागणी माहिती रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणुकीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रिपाइंच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद बोलावली होती. मुंबई ठाणे या महत्वाच्या महापालिकेत शिवसेना भाजपची युती व्हावी अशी आमची भूमिका होती. मात्र युती तुटल्याने दुःख वाटतंय असे महातेकर म्हणाले. राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषद निवडणुकीत रिपाइ भाजपबरोबर युती लढणार आहे तसे आदेश सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. मुंबईसाठी रिपाइंने पूर्ण तयारी केली आहे. १५० वार्डातून कार्यकर्त्यांचे अर्ज आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आहे. जलपास ७५-८० वार्डात उमेदवार तयार आहेत. त्यामुळे ६० जागांच्या यादीचा प्रस्ताव भाजपला देण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी ४५ जागा मिळाव्यात आमचा आग्रह राहणार आहे असे महातेकर यांनी सांगितले. ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे त्याच निकषावर जागाची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या कमळ निशाणीवर रिपाईचा उमेदवार लढणार नाही अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यापूर्वीच मांडली आहे. त्यामुळे रिपाईचा उमेदवार निवडणूक आयोगाने दिलेल्या स्वतंत्र निशाणीवर लढणार आहे. रिपाइंच्या उमेदवाराला भाजपची मते मिळत नाहीत ती मते मिळावीत यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात येणार आहे. तसेच रिपाइंच्या जागांसंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी बोलणे झाले असून आज रात्री किंवा उद्या बैठक होणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आठवले पंजाब असल्याने ते पत्रकार परिषदेला उपस्थित नाही. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे, सुमंतराव गायकवाड, मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे आदी उपस्थित होते.

रिपाइंला कोणत्या जागा हव्यात

ईशान्य मुंबई विधानसभा मतदार संघातील २ ते ३ जागा, दिंडोशी, गोरेगाव, दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ, नायगाव, वरळी, डिलाईट रोड त्याशिवाय आरक्षित जागांवर मागणी केली आहे. तसेच रिपाईकडे ओबीसी उमेदवार असल्याने जागांची मागणी करण्यात आली आहे. यंदा महिलां प्राधान्य देणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget