महाराष्ट्राला मुलांचे विजेतेपद

मुंबई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शेवटच्या दिवशी शानदार कामगिरी बजावताना मुलांच्या गटात २ सुवर्ण व २ रौप्यपदके पटकावली. मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने एकूण ५ सुवर्ण व ३ रौप्यपदके पटकावताना पहिल्या शालेय राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेमधील १२0 किलो गटात चैतन्य खटावकरने, १२0 किलोवरील गटात प्रणव खुळेने, ७४ किलो वजनी गटात दिग्विजय पाटीलने तर ६६ किलो वजनी गटात शमीम खानने आणि ५३ किलो वजनी गटात शुभम शिंदेने महाराष्ट्राला एकूण ५ सुवर्णपदकांची कमाई करून दिली.
शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथील स्पर्धेत महाराष्ट्राच्या चैतन्य खटावकरने १२0 किलो गटातील स्कॉट प्रकारात २५२.५ किलो, बेंच प्रेस प्रकारात ११७.५ किलो तर डेडलिफ्ट प्रकारात २३५ किलो (एकूण वजन : ६0५ किलो) वजन उचलताना सुवर्णपदक पटकावले. आंध्र प्रदेशाच्या दत्तलराज सिद्धयन याने ५२५ किलो वजन उचलताना रौप्य तर पाँडेचेरीच्या के. चंदरने ४६0 किलो वजन उचलताना कांस्यपदक पटकावले.

१२0 किलोवरील गटात महाराष्ट्राच्या प्रणव खुळेने स्कॉट प्रकारात २३0 किलो, बेंच प्रेस प्रकारात ११0 किलो तर डेडलिफ्ट प्रकारात १९0 किलो वजन उचलताना या गटात सुवर्णपदक पटकावले. पंजाबचा संदीप सिंगने ३४५ किलो वजन उचलताना रौप्य तर, पाँडेचेरीच्या पी. मुहेशने १९0 किलो वजन उचलताना कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या शालेय मुलांनी पहिल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद जिंकून प्रशंसनीय कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्राच्या शाळांमधून पुढील वर्षी डीएसओ स्पर्धांत मोठा प्रतिसाद मिळणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget