मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शिकाऊ वाहन परवाना थेट त्यांच्या महाविद्यालयातून मिळावा या उपक्रमाचा प्रारंभ आज परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते कीर्ती महाविद्यालयातून करण्यात आला.
या उपक्रमानुसार आता राज्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनाचा शिकाऊ वाहन अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) थेट त्यांच्या महाविद्यालयात वितरीत करण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.
यावेळी परिवहन आयुक्त यांनी विद्यार्थ्यांशी ट्रॉफिक नियमांबाबत संवाद साधला. तसेच परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दलालांपासून संरक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेची बचत, प्रवास खर्च, श्रमाची बचत कसे होईल याचे विद्यार्थ्यांना त्यांनी महत्त्व पटवून दिले.

Post a Comment