मालमत्ता कर माफ केल्यास चारशे कोटींचा फटका

मुंबई : एकीकडे जकात बंद होत असल्याने मुंबई महापालिका उत्पन्नाचे पर्याय शोधत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन ५00 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र याची अंमलबजावणी झाल्यास महापालिकेला सुमारे चारशे कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे.


मुंबई महापालिकेच्या तिजोरीत सर्वात जास्त रक्कम जकातीतून जमा होते. वर्षाला ७ हजार कोटी रुपये उत्पन्न पालिकेला मिळते. मात्र आता जकात बंद होऊन जीएसटी लागू होणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर परिणाम होणार आहे. यामध्ये मालमत्ता करातून मिळणार्‍या रकमेचा पालिकेला आधार होता. मागील वर्षी पालिकेकडे ४ हजार ९00 कोटींचा मालमत्ता कर जमा झाला होता. यंदा ५ हजार ४00 कोटींपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्याचे पालिकेचे उदिष्ट्य होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ५00 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्याचे म्हटले आहे. शिवाय ७00 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर सवलतही दिल्यास हा बोजा आणखी सुमारे दोनशे कोटींने वाढणार आहे. हा निर्णय लागू झाल्यास पालिकेला ४00 हून अधिक कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे. जकात बंद होणार असल्याने पालिकेला वर्षाला मिळणारे ७ हजार कोटींचे उत्पन्न बंद होणार असल्याने पालिकेसमोर हा तोटा कसा भरून काढायचा हा प्रश्न होता. ही तूट भरून काढण्यासाठी पालिका विविध पर्याय शोधत असतानाच मालमत्ता कर माफीचे गाजर दाखवण्यात आले आहे.

सध्या मुंबईत व्यावसायिक व निवासी ३0 लाख गाळे, घरे आहेत. त्यापैकी ५00 चौरस फुटांपर्यंत निम्म्या म्हणजे १५ लाख घरांचा समावेश आहे. त्यामुळे जकात, मालमत्ता करमाफी आणि सवलतीनंतर महापालिकेच्या उत्पन्नाचे संतुलन ठेवण्यासाठी साधारण साडेसात हजार कोटींच्या आसपास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय या करमाफीचा बोजा कर्मशिअल व ५00 चौरस फुटांपेक्षा अधिक घरांवर बोजा पडणार आहेच; पण पालिकेने हाती घेतलेल्या मोठय़ा प्रकल्पांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget