मुंबई : मुंबई महापालिकेच्या एफ / दक्षिण विभागात कचरा वर्गीकरणाच्या जनजागृतीसाठी सेग्रेगेशन मॅन या अभिनव संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा केलेल्या स्वयंसेवकांनी विभागातील विविध परिसरांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरणाबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातून जमा करण्यात येणार्या कचर्याची विभाग स्तरावरच सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावता यावी, यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामध्ये घरोघर जाऊन कचरा संकलन, कचर्याचे विभाग स्तरावर वर्गीकरण करता यावे, यासाठी कचरा वर्गीकरण केंद्र, उद्यानातील कचर्याचे विघटन व्हावे, यासाठी गांडूळ खत प्रकल्प व सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्प यांसारखे प्रकल्प राबवले जात आहेत. कचर्याचे सुयोग्य वर्गीकरण करणो पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कचर्यामधील विविध घटकांचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण केल्यास पुनर्चक्रीकरण करता येईल, असा कचरा पुनर्चक्रीकरणासाठी पाठवणो, तर जैविक पद्धतीने विघटनशील कचर्यापासून सेंद्रीय खत तयार करणो सोयीचे होणार आहे. त्यामुळेच पालिकेने ही संकल्पना राबवली आहे. सेग्रेगेशन मॅन या संकल्पनेंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेवर कचरा वर्गीकरणाचे संदेश असलेले स्वयंसेवक विभाग परिसरात जनजागृती करत आहेत.
विशेष म्हणजे हे स्वयंसेवक कचरा वर्गीकरणाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना व नागरिकांना करून दाखवत आहेत. ज्यामुळे कचरा वर्गीकरण नक्की कसे करावे, याची माहिती प्रभावीपणो लोकांपर्यंत पोहचत आहे. महापालिकेच्या एफ दक्षिण विभागामध्ये परळ, लालबाग, करी रोड, शिवडी, कॉटन ग्रीन, काळाचौकी यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश आहे. तसेच वाडिया रुग्णालय, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, महापालिकेचे केईएम रुग्णालय यांसारखी मोठी रुग्णालये असणार्या या विभागात मोठय़ा प्रमाणात घनकचरा तयार होत असतो. त्यामुळे या ठिकाणी ही संकल्पना राबवली जात आहे.
Post a Comment