तिकीटाच्या रांगेतल्या नाराजांची पक्षांतराची तयारी जोरात
गेल्या चार दिवसांत सहा नगरसेवकांचे पक्षांतर
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुक जाहीर होताच सर्वच पक्षामध्ये निवडणुकीतले वातावरण हळू हळू चांगलेच तापायला लागले निवडणुकीची तिकीट मिळत नसल्याने काही इच्छुक नगरसेवक दुसर्या पक्षातजायायला लागले असून नाराजांचे पक्षांतर सुरू झाले आहे. मागील चार दिवसांत 6 विद्यमान व माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. तिकीटाच्या रांगेतल्या नाराजांची संख्या मोठी असून तिकीट नाही मिळाले तर येत्या तीन चार दिवसांत अजून काहीजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे पक्षांतर करणा-यांची संख्या अजून वाढणार आहे.
मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली जात आहे या पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच पक्ष, इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. तिकीट मिळण्यासाठी काहींनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामध्ये विद्यमान व माजी नगरसेवक तसेच अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते तिकीट मिळावे यासाठी प्रतीक्षेत आहेत. तिकीट मिळण्याची शक्यता नसलेले पक्षांतर किंवा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागील तीन - चार दिवसांत सहा नगरसेवकांनी पक्षांतर केले. यांतील पाच नगरसेवकांनी भाजपचा रस्ता धरला आहे. येत्या काही दिवसांत अजून काही पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे ही संख्या वाढणार आहे. तिकीटाच्या रांगेत विद्यमान नगरसेवक, काहींचे नातेवाईक, माजी नगरसेवक तसेच मागील अनेक वर्ष पक्षांत प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, विभाग व शाखाप्रमुखांचा समावेश आहे. यांमध्ये तिकीट मिळण्याची खात्री असणारे कामाला लागले आहे. तर काहींना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर शिवाय़ सद्याच्या पक्षात तिकीट मिळाले तरी निवडून येण्याची शक्यता नसलेल्यांनी पक्षांतर केले आहे. तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक, काँग्रेसचे परमिंदर भामरा, मनसेचे नगरसेवक भालचंद्र आंबोरे व शिवसेनेच्या लीना शुक्ला हे पाचही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर मागील 20 वर्ष नगरसेवक राहिलेल्या काँग्रेसच्या ज्य़ेष्ठ नगरसेविका वखारुनिस्सा अन्सारी यांना काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्या एमआयएममध्ये गेल्या आहेत. तिकीट मिळाले नाही तर काही बंडखोरीच्या तयारीतही आहेत. त्यामुळे तीन -चार दिवसानंतर निवडणुकीच्या आखाड्यात रंगत येणार आहे.

Post a Comment