'लाईफ ओके'वरील 'खूँख्वार- सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स' या मालिकेत लवकरच रूपसुंदर नीता शेट्टी हिचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत नीता 'विचुखी' या अर्धी मानव-अर्धी विंचू असलेल्या विंचूकन्येची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत नीताला अगदी भिन्न लूक दिला गेला आहे. भारतीय टीव्ही मालिकेत प्रथमच एका 'विंचूकन्ये'चे चित्रण करण्यात येणार आहे. आपल्या भूमिका काळजीपूर्वक निवडणारी नीता या भूमिकेबाबत सांगते, 'मी यापूर्वी अशी भूमिका पडद्यावर कधीच साकारलेली नाही. किंबहुना अर्धी मानव-अर्धी विंचू अशा स्वरूपाची कोणतीही व्यक्तिरेखा यापूर्वी भारतीय टीव्हीवर सादरच झालेली नाही, असे मी म्हणेन. त्यामुळे मला ही संधी मिळताच मी ती ताबडतोब उचलली.' मालिकेतील आपल्या लूकबद्दल नीता म्हणाली, मला माझी भूमिका खूप आवडली असून त्यातील माझा लूक पूर्णपणे वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आहे; कारण यापूर्वी अशी भूमिका कोणी साकारलेलीच नसल्याने त्यांनाही कोणताही संदर्भ नव्हता. या भूमिकेवर मी खूश असून ही मालिका कधी सुरू होते आहे आणि माझी व्यक्तिरेखा सादर झाल्यावर त्यावर प्रेक्षकांची कोणती प्रतिक्रिया उमटते, याकडे माझे लक्ष लागले आहे.
Post a Comment