मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांच्या अवतीभवती असणार्यांना तिकीट मिळणार नाही, असे काही दिवसांपूर्वी ठणकावून सांगितले होते. मात्र, त्यानंतरही पालिका निवडणुकीच्या रिंगणात आमदार पुत्रांना उतरवण्याच्या हालचालीने भाजपामधील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. हर्ष मेहता, आकाश पुरोहित, दीपक ठाकूर यांची नावे पुढे आल्यामुळे घाटकोपर, मुंबादेवी आणि गोरेगावमधील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांनी नाराजीचा सूर आवळला आहे.
एकीकडे युतीबाबत चर्चेचे गुर्हाळ सुरू असताना दुसरीकडे इच्छुक व काही निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाकडून तिकीट मिळेल, या अपेक्षेत आहेत. असे असताना विद्यमान आमदार पुत्रांची पालिका निवडणुकीत वर्णी लावण्याची खलबते सुरू आहेत. त्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश मेहता यांनी आपला मुलगा हर्ष मेहता याला घाटकोपरमधून १३२ वॉर्डमध्ये उभे करण्यासाठी प्रय▪सुरू केले आहेत. तर गोरेगावमधून वॉर्ड क्रमांक ५0 मधून भाजपाच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर इच्छुक आहे. तसेच आमदार राज पुरोहित हे आपला मुलगा आकाश पुरोहित याला वॉर्ड क्रमांक २२१ मधून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या तीनही वॉर्डांमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी आहे. घाटकोपरच्या १३२ क्रमांक वॉर्डमधून माजी नगरसेवक, गटनेते आणि भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे इच्छुक आहेत. तसेच विद्यमान नगरसेविका फाल्गुनी दवे, मंगल भानुशाली हेही या वॉर्डातून इच्छुक आहेत. शिवाय या वॉर्डासाठी काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा हेसुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना भाजपामध्ये आणण्याचे जोरदार प्रय▪सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक ५0 साठी दीपक ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, या वॉर्डसाठी सुमंत घैसास हे इच्छुक आहेत. तसेच प्रफुल्ल देढिया हेसुद्धा इच्छुक आहेत. विद्या ठाकूर यांना तीन-चार वेळा नगरसेविकापद दिले. जयप्रकाश ठाकूर यांना अनेकदा आमदारकी मिळाली. दीपक ठाकूर हे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे एकाच घरात किती पदे देणार, असा सवाल विचारला जात आहे.

Post a Comment