शिक्षक परिषदेची मागणी मंजूर
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील कोकण, नागपूर व औरंगाबाद शिक्षक मतदार संघात होणाऱ्या निवडणुकित शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर करण्यात आली असून मुंबईतील शिक्षकांनाही आता रजा मंजूर करण्यात येणार आहे
याबाबत शिक्षक परिषद मुंबई विभागाचे शिवनाथ दराडे,दिलीप आवारे , अनिल बोरनारे व सुभाष अंभोरे यांनी आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अनिल वळवी , संजय देशमुख (अतिरिक्त आयुक्त), पवार( उपायुक्त) यांची भेट घेतली व मुंबईत विविध शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात वास्तव्य करीत असल्याने कोकण विभागाचे मतदार आहेत कोकण विभागात ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश होतो त्यामुळे मुंबईत नोकरी करणारे व ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्ह्याचे रहिवासी शिक्षक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मुंबईतील शिक्षकांना 3 फेब्रुवारी निवडणुकीच्या दिवशी रजा मंजूर करावी असे अनिल बोरनारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले त्यावर याबाबत एक दोन दिवसात पत्र काढून मुंबईतील मतदार असलेल्या शिक्षकांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी परिपत्रक काढण्याचे आश्वासन सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी दिले

Post a Comment