काकासाहेब खांबाळकरांचा गट रिपाइं (ए)मध्ये विलीन

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात साकारला जात असून त्यात सर्व रिपब्लिकन गटांनी आपले गट विलीन करावेत, असे आवाहन करतानाच रिपब्लिकन पक्ष (पुनर्बांधणी) हा गट आपण रिपाइं (ए)मध्ये विलीन करत असल्याची घोषणा ज्येष्ठ रिपाइं नेते काकासाहेब खांबाळकर यांनी केली.


संपूर्ण देशात आठवले यांचे नेतृत्व विश्‍वासार्ह आणि लोकप्रिय आहे. त्यांच्या नेतृत्वातील रिपाइंला संपूर्ण भारतात व्यापक जनाधार आहे. सर्व जातीधर्मांचे, वर्गाचे लोक रिपाइं (ए)ला पसंती देत असल्यामुळे आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं (ए) हाच पक्ष दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवू शकतो, हा दुर्दम्य विश्‍वास असल्यानेच आपण रिपाइंमध्ये जाहीर प्रवेश केल्याचे प्रतिपादन खंबाळकर यांनी केले या वेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे, डी. एम. चव्हाण, गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, रामू काळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या आदेशानुसार काकासाहेब खंबाळकर यांची रिपाइंच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती या वेळी देण्यात आली. 

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget