शिवसेना -भाजपच्या वचननाम्यातील घोषणा अपूर्णच - संजय निरुपम यांचा आरोप

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – सन २०१२ च्या पालिका निवडणुकीत शिवसेना भाजपने जाहीर केलेल्या वचनाम्यातील एकही घोषणा गेल्या पाच वर्षात पूर्ण झालेली नाही. युतीच्या फसव्या घोषणा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी निरुपम यांनी युतीच्या मागील वचनाम्याची चिरफाड केली.
मागील वचनाम्यात मुंबईकरांना मुबलक व शुध्द पाणी देण्याची घोषणा केली होती. गारगाई व पिंजाळ या प्रकल्पातून अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा केली. पण पाच वर्ष उलटून गेली तरी अजून साधा फिजिकल रिपोर्ट ही तयार झालेला नाही. रुग्णांसाठी हेल्थ कार्ड देणार होते. मात्र अजूनही ते कोणालाही मिळालेले नाही. मराठी शाळांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली. परंतु मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ३६ शाळा बंद पडल्या आणि ४०००० विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत. पाच वर्ष शिवसेना भाजपा युती झोपली होती काय? असा सवाल संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच मागील वचनाम्यात येत्या पाच वर्षात मुंबईत १४ उड्डाण पूल बांधणार होते. पण त्यांनी एक हि उड्डाण पूल बांधलेला नाही. गोराई, कांजुरमार्ग, मानखुर्द या डम्पिंग ग्राउंड मधून वीजनिर्मिती करणार होते. किती वीजनिर्मिती झाली? वीज निर्मितीचा साधा रिपोर्ट ही तयार केलेला नाही. डम्पिंग ग्राउंडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पूर नियंत्रण प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. वालभाट, ओशिवरा, पोयसर, दहिसर या नद्या सांडपाणी मुक्त करणार व त्यांचे सुशोभीकरण करणार होते. किती नद्यांचे सुशोभीकरण झाले. शिवसेना भाजपने आजपर्यंत काहीच केलेले नाही. त्यांनी काय केले ते सांगावे असे आव्हानही निरुपम यांनी दिले. तसेच फेरीवाले क्षेत्र करणार होते तो प्रश्न हि मार्गी लागलेला नाही. 

मुंबईत किती फेरीवाले क्षेत्र निर्माण केले. महिलांसाठी आरोग्य केंद्र उभारणार होते. त्याचे काय झाले? मुंबईत किती महिला आरोग्य केंद्र उभे राहिले आहेत? आपत्ती व्यवस्थापन विभाग उभारणार होते तेही त्यांच्या कडून झालेले नाही. पाच वर्षात धूळ मुक्त मुंबई हि एक मोठी घोषणा त्यांच्या वचननाम्यात होती, परंतु असे काहीच झालेले नाही. मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रिकेट अकादमी उभारणार होते, तेही करू शकलेले नाही. सुसज्ज व अत्याधुनिक अग्निशमन केंद्र करणार होते. महापालिकेने १३५ मजल्याच्या बांधकामाला परवानगी दिली आहे आणि अग्निशमन दलाकडे फक्त २५ मजल्यापर्यंतच आग विझविणारी शिडी उपलब्ध आहे, हाच अत्याधुनिकपणा आहे काय? बेस्टचीही अवस्था दयनीय करून ठेवलेली आहे. बेस्ट आगारांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार होते, परंतु खाजगीकरण केले. २७ बेस्ट आगारापैकी ६ बेस्ट आगार विकून टाकले. मराठी अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेने मुंबईत महाराष्ट्र भवन, मराठी साहित्य भवन आणि मराठी रंगभूमी भवन उभारणार असल्याची घोषणा वचनाम्यात केली होती. गेल्या पाच वर्षात एक हे भवन उभारले नाही. हीच का त्यांची मराठी अस्मिता? असा सवाल हि निरुपम यांनी उपस्थित केला. काँग्रेसने आजपासून प्रभादेवी येथे पथनाट्याची सुरुवात करून मुंबईची दुर्दशा सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा म्हणाले की, शिवसेनेने काल जे जाहीर केले की मुंबईतील ५०० क्षेत्रफळ पर्यंत घरे असणाऱ्यांना मालमत्ता कर माफ करणार, हि काँग्रेसचीच जुनी मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाच काँग्रेसने ही मागणी केली होती. काँग्रेसच्याच मागणीचा शिवसेनेने घोषणा केल्याचा आरोप छेडा यांनी केला.

शिवसेनेने आरोप फेटाळलेमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेनेच्या जाहिर नाम्यावर केलेले आरोप सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी फेटाळले आहेत. काँग्रेस नेत्यांपुढे कोणताही अजेंडा नाही. आम्ही आमचा वचननामापूर्ती केला आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते अशी विविध कामे केली आहेत. काँग्रेसकडे आता बोलण्याकडे काहीही राहिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget