मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी २५ टक्के थेट (ऑन लाईन) प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता पात्र अल्पसंख्यांक शाळा वगळून खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात पालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे रविवार, ०५ ते मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७ दरम्यान कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.परंतु शिक्षण संचालक यांच्या निर्देशानुसार सदर तारखेत बदल करण्यात आला असून सुधारित तारीख आज गुरुवार, ०९ फेब्रुवारी, २०१७ रोजी दुपारी १.०० वाजेपासून शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७ पर्यंत करण्यात आली आहे. इतर सर्व माहिती यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसारच असणार आहे. अधिक माहितीकरीता व ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Post a Comment