मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर न करता प्रकाश आंबेडकर यांच्या भाऱिप बहुजन महासंघाच्या 45 उमेदवारांनी अर्ज भरून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. उर्वरित जागांवर उमेदवार गुरुवारी किंवा शुक्रवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रवक्ते महेश भारतीय यांनी दिली. पालिका निवडणुकीत भारिपसोबत आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना व डावे यांनी आघाडी केली असून आघाडीने सर्व 227 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांनी यावेळी युती, आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, रामदास आठवले यांची रिपाइंने भाजपसोबत युती केली आहे. प्रकाश आंबे़डकर यांनी मात्र कोणत्याही मोठ्या पक्षासोबत न जाता रिपब्लिकन सेना डावे या समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारिप 100 जागांवर व उर्वरित जागा रिपबल्किन सेना व डाव्यांनी लढवणार आहे. आघाडीने जागा वाटप करून 45 उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून अर्ज भरल्यानंतर सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment