पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या तयारी कामांचा राज्‍य निवडणूक आयुक्‍त तसेच मुख्‍य निवडणूक निरि‍क्षकांनी घेतला आढावा

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या निवडणूक पूर्व अंतीम तयारी कामांचा महाराष्‍ट्र राज्‍याचे निवडणूक आयुक्‍त जे.एस. सहारि‍या व राज्‍य निवडणूक आयोगाकडून नेमण्‍यात आलेले मुख्‍य निवडणूक निरिक्षक यु.पी.एस. मदान यांनी परळच्‍या के.ई.एम रुग्‍णालयातील जिवराज मेहता सभागृहात आज १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या बैठकीत सविस्‍तर आढावा घेतला.

बैठकीला महापालिका आयुक्‍तअजोय मेहता, विक्रीकर आयुक्‍त राजीव जलोटा, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या आयुक्‍त व्‍ही. राधा, राज्‍य निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्‍ने, सह पोलिस आयुक्‍त देवेन भारती, आयकर आयुक्‍त अमोल कामत, अति‍रिक्‍त पालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, उप आयुक्‍त (करनिर्धारक व संकलक) डॉ. बापू पवार, पालिकेचे सर्व परिमंडळ उप आयुक्‍त, पोलिस विभागाचे उप आयुक्‍त, सर्व सहायक आयुक्‍त, २३ निवडणूक निर्णय अधिकारी, २३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५ निवडणूक निरिक्षक (खर्च) तसेच संबधित पालिका अधिकारी उपस्थित होते.महाराष्‍ट्र राज्‍याचे निवडणूक आयुक्‍त जे.एस. सहारि‍या यांनी प्रारंभी संबधित सर्व अधिकाऱयांकडून निवडणूक पूर्व तयारी कामांचा आढावा घेतला. निवडणूक आयुक्‍त जे.एस. सहारि‍या उप‍स्थितांना मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, मतदान व मतमोजणीच्‍या काळात सर्वांना समान संधी देणे तसेच वागणूक ही सर्वांना समान द्यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्‍लंघन होत असेल तर कडक कारवाई करावी तसेच मतदारांवर प्रलोभन व दबाब टाकला जात असल्‍याची तक्रार प्राप्‍त झाल्‍यास योग्‍य ती कार्यवाही करण्‍याचे आदेश त्‍यांनी सर्व संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिले. मतदान व मतमोजणीची सर्व माहिती ही संगणकाव्‍दारेच उपलब्‍ध व्‍हावी तसेच ही माहिती द्यायला उशिर होणार नाही याची योग्‍य ती खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी घ्‍यावी अशी सूचनाही केली. नविन मोबाईल अपलिकेशनचे कोणाला प्रशिक्षण द्यायची आवश्‍यकता असेल तर ते तातडीने द्यावे, त्‍याचबरोबर अपंग व वृध्‍दांसाठी मतपत्रिका ही ठळक अक्षरात छापण्‍यात आली असून याची माहिती संबधितांना द्यावी अशी सूचनाही निवडणूक आयुक्‍तांनी यावेळी केली. त्‍याचबरोबर उमेदवारांकडून खर्चाचा हिशोब योग्‍य त्‍या रितीने मिळावा यासाठी महापालिकेने निवडणूक निर्णय अधिकाऱयांसोबत योग्‍य तो समन्‍वय साधावा अशी सूचनाही त्‍यांनी केली. त्‍याचबरोबर निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आपल्‍या सर्व निवडणूक यंत्रणेवर नजर ठेऊन आहे हे ध्‍यानात घेऊन यादृष्‍टीने आपले काम असले पाहिजे याची खबरदारी घेऊन निवडणूक शांततेत व चांगल्‍यारितीने पार पाडण्‍याची सूचना त्‍यांनी शेवटी केली. मुख्‍य निवडणूक निरिक्षक .यु.पी.एस. मदान यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आपल्‍या विश्वासाला व प्रतिमेला धक्‍का न लागता आपण सर्वांनी काम केले पाहिजे. सर्व यंत्रणाच्‍या योग्‍य त्‍या समन्‍वयातून चांगल्‍या प्रकारे काम कसे पूर्ण करता येईल याची सर्वांनी काळजी घ्‍यावी अशी सूचनाही त्‍यांनी केली. कोणाच्‍याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे सर्वांनी काम करावे अशी मौलिक सूचना त्‍यांनी शेवटी केली. पालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, पालिकेच्‍या वतीने निवडणूकीची संपूर्ण तयारी झाली असून आवश्‍यक त्‍याठिकाणी सर्व निवडणूक साहित्‍य पोहचविण्‍यात आले आहे. मतदारांना मतदानाची चिठ्ठी वाटप करण्‍याचे काम पूर्णत्‍वास आले असून ज्‍या कोणाला चिठ्ठी मिळाली नाही तर त्‍यांनी संबधित पालिका विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपली चिठ्ठी प्राप्‍त करावी. त्‍याचप्रमाणे नागरिकांनी मतदानासाठी मोठया प्रमाणात बाहेर पडावे असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.सह पोलिस आयुक्‍त देवेन भारती यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, पोलिस विभागांच्‍या वतीने विभागनिहाय बंदोबस्‍ताबाबत बैठकी घेण्‍यात आल्‍या असून चुरशीच्‍या लढती तसेच संवेदनशिल ठिकाणी अतिरिक्‍त पोलिस ताफा तैनात ठेवला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ३५ हजार पोलिस २ हजार होमगार्ड व एसआरपीच्‍या १४ कंपनी तैनात करण्‍यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली.प्रारंभी, अति‍रिक्‍त पालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी सादरीकरणाव्‍दारे निवडणूक तयारी कामांची माहिती मान्‍यवरांना दिली. यावेळी राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या आयुक्‍त व्‍ही. राधा व राज्‍य निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्‍ने यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला मोठया प्रमाणात संबधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget