मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या दिवशी गुरुवार, दि.23 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 6 ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतदान कार्यालय व मतमोजणी ठिकाणा करीता वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे. नवजीवन सोसायटी ते गिल्डर लेन म्युनि.शाळा, मुंबई याठिकाणी मतमोजणी असल्यामूळे सकाळी 6 वाजल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी, सी व डी वॉर्ड यांनी परवानगी दिलेल्या वाहनांखेरीज पोलीस, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, व अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांना नवजीवन सोसायटी ते गिल्डर लेन, म्युनि. शाळा, मुंबई हा रस्ता वाहतूकीकरिता बंद ठेवण्यात आला असून तेथे वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त, (शहरे) वाहतूक, मुंबई यांनी कळविले आहे. वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून डॉ.दा.भ.मार्ग वाहतूकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त (शहरे), वाहतूक, मुंबई यांनी केले आहे.
Post a Comment