मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे बंडखोरी मोठ्या प्रमाणात होत आहे मुंबई काँग्रेसच्या पहिल्या यादीच्या घोषणेनंतर उत्तर मुंबईत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे. संजय निरुपम यांनी निरूपम गटाला व स्थानिकांना डावलून तिकीट वाटप केल्यामुळे काँग्रेसचा सुफडा साफ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे कॉंग्रेस खाते ही उघडणार नसल्याची टीका सर्व थरातून होत आहे .
शिवसेना आणि भाजपा वर घोटाळ्यांचे आरोप करणारे निरुपम ह्यांनी तिकीट वाटप घोटाळा केला असल्याचा आरोप सर्व बंडखोरांनी केलेला आहे. इंटकचे मुंबई अध्यक्ष चौथीप्रसाद गुप्ता ह्यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर वर स्पष्टपणे संजय निरुपम ह्यांच्यावर शिवसेना आणि भाजपकडून काँग्रेस संपविण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केलेला आहे. यामुळे विद्यमान काँग्रेस उमेदवारांना प्रभागात प्रचाराला कार्यकर्ते देखील मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाले आहे. एनएसयुआय, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष- मुंबई अध्यक्ष प्रचंड नाराज असून प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रत्येकी 4 ते 5 इच्छुक कार्यकर्ते आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते.दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे यांच्याचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
बंडखोरी आणि तिकीट दिलेले काही वॉर्डवॉर्ड 03 - गेल्या 20 वर्षांपासून स्थानिक कार्यकर्ते चौथी प्रसाद गुप्ता आणि प्रदीप नायर ह्यांना डावलून निरुपम यांनी अभय कुमार चौबे ह्यांना तिकीट दिले. अभय हा कै. राजेंद्र प्रसाद चौबे ह्यांचा हा मुलगा असून तो या प्रभागात राहत देखील नाही. तरीही त्यांना तिकीट देण्यात आल्याने चौथी प्रसाद गुप्ता यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर वरून संजय निरुपम ह्यांनी भाजपा शिवसेनेकडून काँग्रेस पक्ष संपविण्याची सुपारी घेतल्याचे लिहिले आहे.
वॉर्ड 6- सुभाष नहीरे हे हल्लीच राष्ट्रवादीमधून आले असून त्यांना लगेच तिकीट दिल्यामुळे येथील कार्यकर्ते नाराज आहेत.
वॉर्ड 7- बॉबी मॅथ्यू वर्गीस यांना तिकीट देण्यात आले आहे. वर्गीस यांनी पक्षाकडे कधीही तिकीट मागितले नाही, उमेदवारी अर्जही भरलेला नाही किंवा मुलाखत दिलेली नसतानाही त्यांना तिकीट मिळाले. परंतु, ज्यांनी अर्ज केला होता. मुलाखती दिल्या होत्या त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने प्रभागात नाराजी व्यक्त केली जात आहे.
वॉर्ड 8 - जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे ह्यांचे 23 वर्षीय चिंरजीव लौकिक अशोक सुत्राळे यांना आठमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुत्राळे हे ओबीसी असून वॉर्ड 10 मध्ये राहतात. तरीही त्यांना वॉर्ड 8 ह्या खुला गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुत्राळे ह्यांच्या कुटुंबात 3 वेळा विधानसभा, 5 वेळा महापालिका निवडणुकीची तिकिटे दिली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचा दारुण पराभव झालेला आहे.
वॉर्ड 9 - शिवा शेट्टी ह्यांच्या कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या श्वेता शरद कोरगावकर यांना तिकीट दिली आहे. यामुळे स्थानिक कार्यकतर्त्यांवर अन्याय झाला आहे.
वॉर्ड16- मध्ये ही शिवा शेट्टी यांच्या भगिनी विजया लक्ष्मी शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे.
वॉर्ड 10 - कांदिवली (प) चारकोप येथे राहणाऱ्या संदिप मेस्त्री यांना 10 मधून ओबीसी वॉर्डातून उमेदवारी दिली आहे. यामुळे प्रभागातील स्थानिक उमेदवारांना डावलून त्यांना दहिसर विधानसभेत उमेदवारी देण्यात आल्यामुळे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत.
वॉर्ड - 12- दिलीप पार्सेकर खुला गट 90टक्के मराठी विभागात निष्क्रिय असलेल्या हेमंत पांडे ह्यांना उमेदवारी
वॉर्ड 13 - विनय पाटील ह्या ओबीसी उमेदवाराला खुल्या गटातून उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक उमेदवार नाराज आहेत.
वॉर्ड18- भाजपातून 3 वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये आलेले व वॉर्ड 15 मध्ये वास्तव्य असलेले दिलीप पंडित पंडित ह्यांना उमेदवारी दिली.
वॉर्ड 35- पारुल मेहता 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. त्वरित स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणूक. गेल्या 5 वर्षात सतत निष्क्रिय तरी ही तिकीट.

Post a Comment