निवडणुकिसाठी महापालिका सज्ज - संजय देशमुख

निवडणुकीसाठी ४१ हजार कर्मचारी तर 35 हजार पोलिस कार्यरत
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक 21 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात संपन्न होत असून या निवडणुकिसाठी निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली महापालिका व पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ साठी एकूण २२७ प्रभाग आहेत. या २२७ प्रभागांमधून २ हजार २७५ एवढे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये १ हजार १९० पुरुष उमेदवार, १ हजार ८४ महिला आणि एका इतर उमेदवाराचा समावेश आहे.या निवडणुकीसाठीच्या अद्ययावत मतदार यादीनुसार मतदारांची एकूण संख्या ९१ लाख ८० हजार ४९१ एवढी आहे. यामध्ये ५० लाख ३० हजार ३६१ पुरुष, ४१ लाख ४९ हजार ७४९ स्त्रिया आणि ३८१ इतर मतदारांचा समावेश आहे. यानुसार २२७ प्रभागांसाठी प्रत्येक प्रभागनिहाय सरासरी मतदार संख्या ४० हजार ४४२ एवढी आहे.मतदान दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत होणार आहे. महापालिका क्षेत्रात २२७ प्रभागांसाठी ७ हजार ३०४ मतदान केंद्र असणार आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी किमान ५ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यानुसार ३६ हजार ५२० कर्मचारी हे मतदान केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत. याव्यतिरिक्त साधारणपणे ४ हजार ८०९ कर्मचारी हे राखीव वा इतर संबंधित कामांसाठी कार्यरत असणार आहेत. यानुसार या निवडणुकीसाठी ४१ हजार ३२९ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.या कर्मचा-यांमध्ये महापालिकेच्या साधारणपणे २३ हजार कर्मचा-यांचा समावेश असून उर्वरित कर्मचारी हे महाराष्ट्र शासन, बेस्ट उपक्रम,अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, म्हाडा इत्यादी संस्थांचे आहेत. निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या कर्मचा-यांना दोन दिवसीय सविस्तर प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.या निवडणुकीसाठी साधारणपणे ७ हजार ९९४ कंट्रोल युनिट तर ९ हजार २७९ एवढे बॅलेट युनिट व मेमरी असणार आहे. यामध्ये आरक्षित संचांचाही समावेश आहे. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान निवडणूक विषयक साहित्य एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे व इतर संबंधित कामे यासाठी साधारणपणे ३ हजार ६०० एवढ्या वाहनांचा वापर केला जाणार आहे.पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७' साठी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रुपये ९४ कोटी ९० लाख ५० हजार एवढी आहे. याव्यतिरिक्त अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये मतदार याद्यांच्या छपाईसाठी रुपये ४० लाख तर मतपत्रिकांच्या छपाईसाठी रुपये १० लाख एवढी तरतूद करण्यात आली होती.आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात १३ स्टॅटीक पथके, ९८ भरारी पथके; तर ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथके यांचा समावेश आहे. ही सर्व पथके उपायुक्त (अतिक्रमण निर्मुलने) यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) हे आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख अधिकारी आहेत.तर विभाग पातळीवर सहाय्यक आयुक्त हे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आहेत. सर्व विभाग कार्यालयात भरारी पथके, व्हीडीओ सर्व्हेलन्स पथके; तसेच व्हीडीओ व्ह्यूव्हींग चमू कार्यरत आहेत.
महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. तर अनुज्ञापन अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली मुख्य आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पेड़न्यूजवर कारवाई

निवडणुकीदरम्यान पेड़ न्यूज तीन तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पालिकेने स्थापन केलेल्या पेड़न्यूजबाबतच्या समितीने राज्य निवडणुक आयोगाकड़े आपला अहवाल सादर केल्यावर 3 वृत्तपात्रांच्या प्रकाशकाना आणि उमेदवाराला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील चौकशी सूरु असून उमेदवार व प्रकाशक यांच्यावर कारवाई केली जाईल असे देशमुख यांनी सांगितले.

पक्षनिहाय उमेदवार
1 - सी.पी. (आय ) – 10
2 - बी.जे.पी. - 211
3 - एन.सी.पी. - 171
4 - सी.पी. ( एम ) – 11
5 - बी.एस.पी. -109
6 - आय.एन.सी. - 221
7 - शिवसेना - 227
8 - मनसे - 201
9 - एस.पी. -76
10 - जे.डी.एस. - 10
11 - एल.पी. - 01
12 - ऐ.आय.ऐ.डि.एम.के. - 03
13 - ऐ.आय.एम.आय.एम. - 56
14 - अन्य मान्यता प्राप्त पक्ष - 251
15 - अपक्ष - 717

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget