मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका उप आयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) रणजित ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता समितीची स्थापना करण्यात आली आहे.आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असल्यास पालिकेच्या संबधित विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे नागरिकांना तक्रार करता येईल. त्याचप्रमाणे १९१६ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना अश्या प्रकारच्या तक्रारी दाखल करता येतील.
Post a Comment