शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरीला जोर

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशीही शिवसेनेमधील मोठ्या प्रमाणात नाराजी कायम राहिली होती. गुरुवारी विद्यमान नगरसेवक नाना अंबोले आणि दिनेश पांचाळ यांनी बंडखोरी केल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभादेवी व माहिममध्येही बंडाळी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत वॉर्ड क्र. 200 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तर माहीम येथील वॉर्ड क्रमांक 190 मधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या महिला शाखासंघटक रोहिता ठाकूर यांनी बडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेमध्ये सामना रंगणार आहे.
लालबाग - परळ, माहिम- दादर - प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र येथेच बंडाळी होऊन शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट दिल्याने शिवसेनेचे नाराज महेश सावंत यांनी त्याविरोधात बंड पुकारलं आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड 194 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे प्रभादेवी विभागात शिवसेनेअंतर्गतच सामना रंगणार आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ‘मातोश्री’वर सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. अखेर समाधान सरवणकर यांच्या बाजूनं कौल मिळाल्याने शिवसेनेच्या महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर माहिम येथील वॉर्ड क्रमांक 190 मधून वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरून बंडखोरी केली आहे. माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या उमेदवारीचा वाद मि़टून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी त्यांच्या विरोधात नाराज तीन शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच वॉर्ड क्रमांक 77 मधून बाळा नर यांच्या विरोधातही चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. पण आता या भागातच शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. वॉर्ड पुनर्रचनेत अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकांचा वॉर्ड विभागला आहे. त्यामुळे येथे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ट राहिलेल्या इच्छुक शिवसैनिक तिकीट मिळेल या अपेक्षेत होते. मात्र ही अपेक्षा भंग झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये पडसाद उमटले आहेत. विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना शिवसैनिकांची बंडाळी मोडून त्यांना वॉर्ड क्रमांक 199 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पेडणेकर यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध होता. शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्रमांक 199 (सातरस्ता-डिलाईलरोड-ऑर्थर) रोड इथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उमेदवारीवरूनही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर वॉर्ड क्र. 198 मधून अर्ज भरणार असल्याचं निश्चित झाले व त्यांनी अर्जही दाखल केला. ‘मातोश्री’वरुन आदेश आल्यानंतर शिवसैनिकांचा आंबेकरांना असणारा विरोधही नंतर मावळला आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget