३ फेब्रुवारीच्‍या सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांना आपला अर्ज हा ०३ फेब्रुवारी च्‍या सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्‍या त्‍या विभागाच्‍या निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे सादर करावा लागणार आहे.
तसेच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सायंकाळी ४ वाजेपर्यंतच भरता येणार आहेत. सायंकाळी ४ नंतर भरलेला अर्ज डाऊनलोड होणार नाही, त्‍यामुळे इच्‍छुक उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्‍यावी, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांसाठी पालिकेच्‍या विभाग कार्यालयात तसेच मध्‍यवर्ती निवडणूक केंद्रामध्‍ये ‘मदत कक्ष’ स्‍थापन करण्‍यात आले असून या कक्षांमध्‍ये उमेदवार अर्ज दाखल करताना येणाऱया अडचणींबाबत हा कक्ष उमेदवारांना मार्गदर्शन करीत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्‍हीही प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांना हा कक्ष मार्गदर्शन करीत आहे . उमेदवारांनी या ‘मदत कक्ष’ चा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget