मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यास मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे पालिका निवडणुकीसाठी शिवसेना -भाजपची पहिलीच गोपनीय उमेदवारी यादी सोशल मिडीयावर वायरल झाल्याने पक्षातील बंडखोरीला व नाराजीला उधाण आले आहे. शिवसेनेने तर बुधवारी रात्रीच एबी फॉर्म वाटप केले. त्यात काही विद्यमान व इच्छुकांचा पत्ता कापल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या. तिकीट कापल्याने काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. वडाळा येथे काही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. तर इच्छुकांना डावलून आमदार-खासदार पुत्रांना तिकीट देऊन घराणेशाहीला प्राधान्य दिल्याने भाजप इच्छुकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
पालिका निवडणूक शिवसेना, भाजपने स्बळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक इच्छुक तसे आजी -माजी नगरसेवकांनी उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली होती.. शिवसेना व भाजपने आप- आपली यादी तयारी केली. मात्र यादी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल या धास्तीने यादी गोपनीय ठेऊन डायरेक्ट एबी फॉर्म वाटप करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाने घेतला होता. शिवसेनेने तर बुधवारी रात्रीच एबी फॉर्म वाटप केले. ही गोपनीय यादी गुरुवारी सकाळी सोशल मिडीयावर वाय़रल झाल्यानंतर शिवसेनेतील बंडालीला सुरुवात झाली. लालबाग -परळ सारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नाना आंबोले यांच्या पत्नीला तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे येथील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला आहे. वडाळ्यात वॉर्ड क्रमांक 178 मधून अमय घोलेना उमेदवारी दिल्याने येथे माधुरी मांजरेकर समर्थकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. येथे नाराज शिवसैनिकांनी शिवसेना शाखेला टाळे ठोकले. तसेच स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्रमांक 199 मधून विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक शिवसैनिकांमध्य़े नाराजीचे वातावरण आहे. अनुशक्तीनगर वॉर्ड क्रमांक 144 येथून खासदार पत्नीला तिकीट दिल्याने विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येथे शिवसेनेने राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुलुंडमधील शिवसेनेचे नेते, माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील गळती भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना व बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने पक्षात धुसफूस वाढली आहे. भाजपमध्ये चार आमदार पुत्रांना उमेदवारी देऊन घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे.
भाजपमध्ये घराणेशाही-
शिवसेनेत बंडाळीला उत आला असताना भाजपमध्ये नेत्यांच्या मुलांना, विद्यमान नगरसेवक व नातेवाईकांना तिकीट दिल्याने इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे. फुटलेल्या पहिल्या यादीत खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना 108 वॉर्डमधून तसेच आमदार राज पुरोहित यांचा पुत्र अवकाश पुरोहित यांना प्रभाग क्रमांक 221 मधून, गोरेगावमधून वॉर्ड क्रमांक ५० मधून भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठावूâर यांचा मुलगा दीपक ठाकूर तसेच आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यांना वॉर्ड क्रमांक २२१ मधून तिकीट मिळाले आहे. भाजपमध्ये घराणेशाही नाही असे सांगणा-या भाजपनेच तिकीट वाटपात घराणे शाहीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांमध्ये नाराजी पसरली असल्याचे चित्र आहे.
विद्यमान नगरसेवकांना पुन्हा तिकीट-
-अलका केरकर - माजी उपमहापौर -( प्रभाग क्रमांक 98)
राजश्री शिरवाडकर यांना (प्रभाग क्रमांक 172 )
-भाजप गटनेते मनोज कोटक (प्रभाग क्रमांक 103 )
सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे (प्रभाग क्रमांक 104 )
विनोद शेलार ( प्रभाग क्रमांक 51)
उज्वला मोडक ( प्रभाग क्रमांक 74)
-अलका केरकर - माजी उपमहापौर -( प्रभाग क्रमांक 98)
राजश्री शिरवाडकर यांना (प्रभाग क्रमांक 172 )
-भाजप गटनेते मनोज कोटक (प्रभाग क्रमांक 103 )
सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे (प्रभाग क्रमांक 104 )
विनोद शेलार ( प्रभाग क्रमांक 51)
उज्वला मोडक ( प्रभाग क्रमांक 74)
इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी-
मंगेश सांगळे ( प्रभाग क्रमांक 118 )
मकरंद नार्वेकर (प्रभाग क्रमांक 227)
हर्षीदा नार्वेकर ( प्रभाग क्रमांक 226 )
मनसे तुन आलेल्या सुखदा पवार यांना प्रभाग क्रमांक 93 मधून उमेदवारी.
..
भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांना प्रभाग क्रमांक 148 मधून उमेदवारी दिली आहे. तसेच भाजप प्रवक्ते अतुल शाह यांना प्रभाग क्रमांक 220 मधून उमेदवारी मिळाली आहे.
मकरंद नार्वेकर (प्रभाग क्रमांक 227)
हर्षीदा नार्वेकर ( प्रभाग क्रमांक 226 )
मनसे तुन आलेल्या सुखदा पवार यांना प्रभाग क्रमांक 93 मधून उमेदवारी.
..
भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांना प्रभाग क्रमांक 148 मधून उमेदवारी दिली आहे. तसेच भाजप प्रवक्ते अतुल शाह यांना प्रभाग क्रमांक 220 मधून उमेदवारी मिळाली आहे.
Post a Comment