भाजपने बिल्डरांना विकल्या मुंबईतील जागा - राहुल शेवाळे

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील गेल्या पंधरा वर्षापासून सुधार समिती ताब्यात असलेल्या भाजपने विकासकांना मुंबईतील जागा विकल्याचा सणसणीत आरोप खासदार राहूल शेवाळे यांनी रविवारी एका
पत्रकार परिषदेत केला. यावेळी 114 जागांवर बहुमत मिळेल, असा दावा करणाऱ्या भाजपला अपयश आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे राजीनामा देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पालिका निवडणूक गेल्या महिनाभरपासून प्रचारामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल शेवाळे व आशिष शेलार यांच्यामध्ये किती जागा कुणाला मिळणार, यावरून कलगीतूरा रंगला. शेलार व शेवाळे या दोघांनी पत्रकार परिषद घेवून आरोप करीत एकमेकांना आव्हान दिले. शेलार यांनी 114 जागांवर विजय मिळवणारच असा दावा केला. तसेच उध्दव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून आपल्या पक्षाला किती जागा मिळतील, हे त्यांनी जाहीर करावे, असे खुले आव्हान त्यांनी केले. त्याला प्रतिआव्हान देताना शेवाळे यांनी, गृहमंत्रालयाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोप भाजपवर केला. परंतु येत्या 23 फेब्रुवारीला मुंबईकर भाजपला त्यांची जागा दाखवून देतील असे ते म्हणाले. भाजपने 114 जागा न जिंकल्यासमुख्यमंत्री फडणवीस आणि शेलार हे आपल्या पदाचा राजीनामा देतील का? असा प्रश्न त्यांनी विचारला. शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवत खासदार राहुल शेवाळे हे मोदींच्या लाटेवर निवडून आले अशी टिका केली. तर शेलार हे मॅच फिक्सर असून किती जागा निवडून येणार हे त्यांनी आधीच भाकित केले. त्यामुळे शेलार यांनी आधीच हार पत्करल्याचे यावरून स्पष्ट झाल्याचे शेवाळे म्हणाले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांच्याविरोधात तक्रार व गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, गृहखात्याकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले. तसेच नोटबंदीच्या रात्री मुख्यमंत्री कोणत्या उद्योजकाला भेटले हे त्यांनी जाहीर करण्याचे आव्हान शेवाळे यांनी शेलारांना केले आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget