31 मार्चपर्यंत प्रवेश मोफत
उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – जुन्या आणि महत्त्वाच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील 7 हम्बोल्ट पेंग्विनचे दर्शन येत्य़ा 17 मार्चपासून होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन झाल्यानंतर पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे. 31 मार्च पर्यंत लोकांना मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर पेंग्विनला पाहण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
पेंग्विनवरून मुंबई महापालिकेत राजकारण गाजल्यानंतर मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन मुंबई महापालिका निवडणुकीनंतर होणार हे स्पष्ट होते. निवडणुकीनंतर स्थायी समिती सदस्यांनी येथे पाहणीही केली. त्यानंतर 6 मार्चला सकाळी या सातही पेंग्विनना हलवण्यात आले. त्यामुळे मुंबई महापौर निवडीनंतर पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना होणार हे स्पष्ट झाले होते.पेंग्विन पाहण्यास येणा-यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येतो आहे. यांमध्ये प्रौढांसाठी 100 व मुलांसाठी 50 रुपये आकारले जाणार आहे. प्रत्येक दिवशी सुमारे 6 ते 7 हजार लोकांना प्रवेश दिला जाणार असून 100 -100 ची बॅच तयार करून सोडले जाणार असल्याची माहिती एका अधिका-य़ांने दिली. पेंग्विनला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते. त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या रंगाचे लेबलही लावण्यात आले आहेत.
राणी बागेत प्रवेश शुल्क 10 पट--सध्या राणीबागेतील प्रवेशासाठी प्रौढांसाठी 5 व लहान मुलांसाठी 2 रुपये आकारले जातात. आता नव्या प्रस्तावानुसार प्रौढांना 50 व लहान मुलांना 25 रुपये द्यावे लागणार आहेत. शिवाय पेंग्विन पाहण्यासाठी तेवढेच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या खिशाला परवडेल त्यानाच पेंग्विनचे दर्शन मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान पेंग्विन दर्शन खुले करण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाले असल्याचेही संबंधित अधिका-यांने सांगितले.
असे पेंग्विनचे दर्शन होणार-- 31 मार्च पर्यंत प्रवेश मोफत
- प्रत्येक दिवशी सुमारे 6 ते 7 हजार लोकांना प्रवेश
-- 1 एप्रिलपासून शुल्क लागू
- - प्रौढांसाठी 100 व लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क
-- दरदिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले राहणार
- बुधवारी बंद

Post a Comment