मुंबई ( प्रतिनिधी ) –भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे मुंबई महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण याबाबतचा पेच अजूनही कायम आहे. या संधीचा फायदा घेत कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. येत्या 17 मार्च रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होणार असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.
शिवसेनेच्या खोलाखाल भाजपचे संख्याबळ आहे. मात्र भाजपने पालिकेत पारदर्शकतेचे पाहरेकरी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा पालिकेतील कोणत्याही पदावर दावा सांगणार नाही, अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. त्यामुळे भाजपा विरोधी पक्षनेतेपदीही स्वीरणार नाही. 31 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसला
मिळावे अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच पालिकेच्या चिटणीसांकडे कॉंग्रेसचे पालिकेतील गटनेते रवी राजा यांनी केली आहे. पालिकेचा चिटणीस विभाग याबाबत कायदेविषक सल्ला घेत असून येत्या 17 मार्च रोजी पालिकेची महासभा आहे. त्या सभेत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय महापौर जाहिर करतील अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे

Post a Comment