मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – महापालिका निवडणुकीनंतर सोमवारी पाच स्विकृत नगरसेवकांची नावे महापौरांनी घोषीत केली. यात शिवसेनेच्या माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव व अरविंद भोसले यांची वर्णी लागली. तर भाजपकडून गणेश खणकर व श्रीनिवास त्रीपाठी आणि कॉंग्रेसकडून सुनील नरसाळे यांना नगरसेवक करण्यात आले. दरम्यान, भोसले यांनी शिवसेनेच्या शिव आरोग्य योजनेतून प्रेरीत होऊन मृत्युपश्यात देहदान करण्याचा संकल्प सोडला.
मुंबई महापालिकेचे २२७ नगरसेवकांबरोबरच ५ स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. पक्षाकडून या नगरसेवकांची निवड केली जाते. महापालिकेत सर्वाधिक ८४ संख्याबळ असल्याने शिवेसेनेच्या वाट्याला २ स्विकृत नगरसेवक निवड करण्याचे संधी होती. यामुळे शिवसेनेच्या माजी पालिका सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असलेले अरविंद भोसले यांची निवड केली. भोसले यांनी नारायण राणे पराभूत होत नाहीत, तोपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. मात्र, आता त्यांनी मृत्युनंतर देहदान करण्याचा नवा संकल्प केला आहे. भाजपेनेही गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रीपाठी यांची तर कॉंग्रेसने दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे यांनी निवड केली.

Post a Comment