मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पावसाळ्यादरम्यान जलजन्य व कीटकजन्य आजारांची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेच्या स्तरावरील आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याला देण्यात आले.
महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या संस्थांच्या मालकीच्या जमिनी वा इमारती आहेत. या इमारतींमध्ये देखील आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी, विशेष करुन या परिसरांमध्ये पाणी साचणार नाही याचीही दक्षता प्रभावीपणे घेतली जावी, यासाठी सर्व संबंधित संस्थांना पत्र द्यावे. तसेच या नंतरही संबंधित संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही केली नाही, तर त्या संस्थेच्या सर्वेाच्च पदावरील व्यक्तीवर संबंधित नियमांन्वये कारवाई करण्याचेही आदेश बैठकीदरम्यान दिले आहेत.खाद्यपदार्थ / पेयपदार्थ विक्रेते यांच्या कडील पदार्थ, बर्फ, पाणी इत्यादींची नमूना चाचणी नियमीतपणे करावी, तसेच चाचणी मध्ये अयोग्य ठरणा-या नमुन्यांबाबत त्वरीत व कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

Post a Comment