पालिका जकातीचा अर्थसंकल्पाला बसणार मोठा फटका

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेचा उत्पन्नाचा मोठा कणा हा जकात आहे या जकातीमुळे पालिका मोठी श्रीमंत ओळखळी जात आहे मात्र येत्या एप्रिलपासून जकात रद्द होणार आहे. जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. जकात रद्द झाल्यास पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे या महिन्याअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्‍यता पालिका वर्तुळात बोलली जात आहे.

सोसोन्याची अंडी देणा-या पालिकेत सुमारे एक लाख अकरा हजार कर्मचारी काम करत आहेत दिड कोटी जनतेला मूलभूत सेवा सुविधा पुरवत आहे जकाती मुळे पालिकेला दररोज 12 कोटी रुपये इतके उत्पन्न जकातीपोटी मिळते. हे उत्पन्न येत्या एप्रिलपासून मिळणार नाही. वर्षाला सात ते आठ हजार कोटी रुपये फक्त जकातीपासून मिळणारे उत्पन्न आता पालिकेला मिळणार नाही. त्यामुळे पालिकेला जकातीचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. पालिकेकडे 61 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्या ठेवी अनेक वर्षांपासूनच्या आहेत. त्या ठेवीही पालिकेचा मोठा आर्थिक आधार आहे. कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीत या ठेवींचा उपयोग पालिकेला करता येईल अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. पालिकेच्या तिजोरीत प्रॉव्हिडंट फंडांची तसेच कर्मचाऱ्यांचा निधी असा एकूण निधी 10 हजार कोटी रुपयांचा आहे. पालिकेकडे पडून असलेला शिलकी निधी सुमारे 11 हजार कोटी रुपये आहे. मात्र जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. हा स्त्रोत बंद झाल्यानंतर तेवढा महसूल मिळण्याचा पर्याय नाही. त्यासाठी सद्या पालिका आकारत असलेल्या विविध करांच्या वाढीचाही पालिकेला विचार करावा लागणार असल्याचे समजते.

राज्य सरकारची लागणार मदतसध्या पालिकेकडे 34 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी आहे. कंत्रादरांकडून ठेवींच्या स्वरूपात सुमारे सात हजार कोटी रुपये जमा आहेत. पालिकेला मालमत्ता करापोटी 5 हजार 200 कोटी रुपये मिळत आहेत. पाणी आणि मलनिःसारण करापोटी 1 हजार 300 कोटी मिळत आहेत. रस्त्यांतील चर खोदण्यासाठीच्या परवानगी पोटीही पालिकेला मोठा महसूल मिळतो. हा महसूलही सुमारे 850 कोटी रुपयांच्या घरात आहे. उत्पन्नाची ही बाजू विचारात घेतली तरी जकात हाच पालिकेला मुख्य आधार आहे. हा आधार गेल्यास पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता होत आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget