बेस्टचा बुडालेला महसूल आता टाटा कडून वसूल करणार

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट कडून मुंबईकरांना ३०३ नवीन बसेस् देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नसून डिसेम्बर १६ च्या अखेरीस ८ तारखेला पहिली नमुना बस येईल असे प्रस्ताव मंजूर करताना सांगितले गेले होते , मात्र मार्च उजाडला तरी टाटाकडून सदर बस अद्यापपर्यंत आलेल्या नाहीत यामुळे बेस्ट च्या बसेस रस्त्यावर न आल्याने बेस्ट चे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे . ते नुकसान टाटा कडून वसुल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस सदस्य रवी राजा यांनी आज हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली

पालिकेकडून नवीन बसेस खरेदीसाठी १०० कोटी मदत मिळाली असून या पैशातून टाटांकडून ३०३ बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव ३ मार्च २०१६ रोजी मंजूर केला गेला , त्यावेळी ८ डिसेम्बर ला नमुना बस येईल व सलग तीन महिन्यात ३०० बसेस येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आपल्या माहितीनुसार जानेवारी अखेरपर्यंत नमुना बस आली नाही , त्यानंतर १ महिन्यानंतर पहिल्या १०० बस येतील असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अजूनपर्यंत एक हि बस ताफ्यात आलेली नाही . त्यामुळे झालेल्या या विलंबास सर्वस्वी बेस्ट प्रशासन जबाबदार असून प्रशासनाकडून योग्य तो पाठपुरावा केला जात नसल्याने मुंबईकरांना नवीन बसेस वेळेवर मिळत नसल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. , बेस्ट च्या बसताफ्यात बसगाड्यांची संख्या खूपच कमी झाल्यामुळे रस्त्यावरील परिस्तिथी बिकट आहे . वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या वेळेवर चालत नाही , त्यातच जुन्या बस लिलावात काढण्याचे प्रमाण वाढले आहे या सर्व परिस्तिथीमुळे एन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे केदार होम्बालकर यांनी लक्षात आणून दिले .अशोक लेल्यांड ला १२ महिन्याचे कंत्राट दिले असते तर त्यांच्या बस उपलबध झाल्या असत्या . मात्र टाटा ने नऊ महिन्यांची मुदत दिली असल्याने सदर कंत्राट टाटा ला देण्यात आले , त्याचे पुढे काय झाले ते दिसतच आहे . हे कंत्राट टाटा ला देण्यात कोणता हेतू होता असा सवाल होम्बालकर यांनी यावेळी केला . 
 
यावर आपली भूमिका विशद करताना महाव्यवस्थापक डाँ . जगदीश पाटील यांनी टाटा उपाध्यक्षांबरोबर २३ फेब्रुवारीला चर्चा केली असता त्यांनी मार्च अखेरपर्यंत १०१ बस देण्याचे कबुल केले आहे . मात्र असे असले तरी टाटा ला विलंबाबद्दल अटींप्रमाणे कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्याप्रमाणे बेस्ट बसेस येण्यास विलंब झाल्यामुळे जे काही आर्थिक नुकसान झाले आहे ते वसूल करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले .

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget