महाराष्ट्रात बौद्धांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार नाहीत - भदंत राहुल बोधी

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात आणि देशात ऍट्रॉसिटीचे प्रमाण वाढले आहे. अनुसूचित जातीतील व विशेष करून बौद्धांवर अत्याचार होत असताना बौद्ध धर्मियांवर कोणत्याही प्रकारे अन्याय अत्याचार होत नाहीत, महाराष्ट्रात बौद्ध धर्मीय पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वक्तव्य युनायटेड बुद्धिस्ट मिशनचे अध्यक्ष डॉ. वेन. भदंत राहुल बोधी यांनी केले आहे. यामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांमध्ये व राहुल बोधी यांच्या अनुयायांमध्येही उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आंतराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेची माहिती देण्यासाठी बोधी आले होते. यावेळी महाराष्ट्रात एट्रोसिटीचे प्रमाण वाढले असताना, बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढले असताना भिक्कू संघ कोणताही निषेध का करत नाही ? मुख्यमंत्र्याना भेटून कारवाईची मागणी का करत नाही या प्रश्नावर उत्तर देताना बोधी यांनी असे प्रकारचं होत नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे अन्याय अत्याचार होत नाही असे सांगणाऱ्या बोधी यांनी बौद्ध धर्मीय शांततेच्या मार्गाने आपला विरोध दर्शवतो. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले अश्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली आहेत असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या वतीने २५ व २६ मार्च रोजी लोणावळा येथे कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांच्या सानिध्यात पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोस्तवात भारतातून देश विदेशातून शेकडो भिक्कू व लाखो उपासक सहभागी होणार आहेत, यावेळी ५०० उपासकांना श्रामणेर दिक्षा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित भित्तीपत्रके व फलक लावलेले जाऊन धम्माच्या शिकवणीचा जागर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पाठिंबा दिला असून यांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा केला जाणार असल्याचे राहुल बोधी यांनी सांगितले आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget