मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकींना सुरुवात झाली असून मंगळवारी पहिल्या टप्प्यात आठ प्रभाग समित्यांवर अध्यक्षपदाच्या निवडणुका पडल्या. यात भाजपकडे चार आणि शिवसेनेकडे तीन समित्या आल्या आहेत. तर भाजपला समर्थन देणाऱ्या अखिल भारतीय सेनेकडे एक प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले.
सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार ज्योत्स्ना मेहता यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. या प्रभागामध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रल्हाद ठोंबरे, जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार आशिष चेंबूरकर, पी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार राजूल देसाई, पी /उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या दक्षा पटेल, आर/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे कमलेश यादव, आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार शीतल म्हात्रे बिनविरोध निवड झाली.
पश्चिम उपनगरांतील पी/दक्षिण आणि पी/उत्तर, आर/दक्षिण आणि आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून आणि शहर विभागातील ए, बी आणि ई, सी आणि डी एफ/दक्षिण व एफ/उत्तर' तसेच 'जी/दक्षिण' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी पीठासीन अधिकारी काम पाहिले.

Post a Comment