अकरा महिन्यात २५ हजार गरीब रुग्णांना दिलासा !
दान देणा-यांना मिळते आयकरात सवलत
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेच्या वैद्यकीय सेवांचा दर्जा, गुणवत्ता यांची संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात ख्याती असून आहे केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येत आहेत या रुग्णालयात येणा-या रुग्णांवर माफक दरात उपचार केले जात आहे मात्र अनेक रुग्णांची तेवढी आर्थिक कुवत नसल्याने अशा रुग्णांना दानशूर व्यक्तींनी केलेल्या दानातून उभारण्यात आलेल्या 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मधून आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे यावर्षी एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान `गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये दानशूर दाते व संस्थांकडून एकूण ३३ कोटी ३५ लाख ५५ हजार २२६ रुपये एवढी रक्कम दान स्वरुपात प्राप्त झाली आहे. या रकमेतून २५ हजार ११७ एवढ्या गरीब रुग्णांवर आर्थिक मदतीच्या माध्यमातून उपचार केले असून त्यांना दिलासा देण्यात आला आहे`गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये दान देणा-या दात्यांना आयकर कलम '८० जी' नुसार आयकरामध्ये देखील सवलत देण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.
शस्त्रक्रिया, औषधोपचार यासारख्या विविध बाबींसाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील गरुजुंना दिलासा मिळावा, या प्रमुख उद्देशाने सन १९२६ पासून पालिकेच्या रुग्णालयांमधून `गरीब रुग्ण सहाय्यता निधी' ची सुरूवात केली आहे या निधी मध्ये समाजातील विविध घटकातील लोक तसेच संस्था, कंपन्या आर्थिक योगदान देत असतात. राज्य वा केंद्र सरकारच्या योजनांमध्ये ज्या प्रकारचे वैद्यकीय उपचार संलग्न नाहीत, तसेच ज्या बाबत कोणत्याही सेवाभावी संस्थेकडून वित्तीय सहाय्य मिळणे शक्य नसेल, अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार अथवा शस्त्रक्रिया इत्यादी करीता रुग्णालयाच्या 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मधून गरजूंना अर्थसहाय्य देण्यात येते. १ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ दरम्यान 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये प्राप्त झालेले दान व गरजू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे पालिकेची चार प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये असून यामध्ये परळ येथील के. इ. एम. रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, जुहू-विलेपार्ले परिसरातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय यांचा समावेश आहे. या चारही रुग्णालयातील 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये एकूण ३२ कोटी ६९ लाख ७८ हजार १३६ रुपये एवढी रक्कम दान स्वरुपात प्राप्त झाली आहे. या रकमेतून २१ हजार ४७१ रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित ५ विशेष रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे व १७५ दवाखाने आहेत. यातील 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये दानशूर व्यक्ती व संस्थांनी एकूण २८ लाख ३३ हजार ९०९ रुपये एवढा रक्कम दान म्हणून दिली आहे. या रकमेतून १ हजार ९५६ गरजू रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.
प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) यांच्या अखत्यारित एकूण १६ रुग्णालये आहेत. या रुग्णालयातील 'गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मध्ये गेल्या ११ महिन्यात ३७ लाख ४३ हजार १८१ रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. यामधून एकूण १ हजार ६९० रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
संबंधित गरजु व्यक्तींनाच या निधी मधून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी अर्जदार रुग्णाने वा त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील `वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता' (Medical Social Worker) किंवा संबंधित `वैद्यकीय अधिकारी' (Medical Officer) यांच्याकडे संपर्क साधणे आवश्यक आहे सदर अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित नियमांच्या अधीन राहून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. सदर रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची खातरजमा झाल्यानंतर व इतर कोणत्याही योजनेमधून किंवा सेवाभावी संस्थांद्वारे सदर रुग्णास मदत मिळू शकत नाही, याचीही खातरजमा झाल्यावर सदर रुग्णास निधी (`PBCF)' मधून अर्थसहाय्य देण्यात येते आहे
आयकर सूट
पालिकेच्या रुग्णालयातील `गरीब रुग्ण सहाय्यता निधी' मधून समाजातील अत्यंत गरजुंना वैद्यकीय बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जाते. या निधी मध्ये देण्यात येणा-या योगदानासाठी संबंधित दात्याला आयकर अधिनियम `८० जी' अंतर्गत विविध तरतुदींनुसार आयकर सूट देखील मिळू शकते.
पालिकेचे आवाहन
गरीब रुग्ण सहाय्यता निधी' करिता देणगी द्यावयाची झाल्यास संबंधित रुग्णालयातील `वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता' किंवा 'अधिष्ठाता' किंवा 'वैद्यकीय अधिक्षक' (Medical Superintendent) यांच्याकडे देणगी रकमेचा धनादेश देता येऊ शकतो. या धनादेशावर संबंधित अधिका-याच्या पदनामासह रुग्णालयाचे नाव लिहिणे आवश्यक आहे याअनुषंगाने दान देऊ इच्छिणा-या दात्यांनी आपल्या परिसरातील पालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Post a Comment