राणीच्या बागेतील पेंग्विन पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीही झुंबड़

20 हजार मुंबईकरानी घेतले दर्शनमुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – भायखळा येथील जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन मुंबईकरांना खुले झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारीही पेंग्विन पाहण्यासाठी हजारो मुंबईकरांनी अफाट गर्दी केली पहिल्या दिवशी सुमारे 12 हजार मुंबईकरांनी पेंग्विनदर्शन घेतले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पेंग्विन पाहण्यासाठी हजारो मुंबई करांची झुंबड़ उडाली होती. 

शुक्रवारी 17 मार्चला राणीच्या बागेमधील पेंग्विन कक्षाचे लोकार्पण झाल्यानंतर शनिवारपासून मुंबईकरांना पेंग्विन पाहाण्यासाठी खुले करण्यात आले. पेंग्विन दर्शन ३१ मार्चपर्यंत मुंबईकरांना मोफत घेता येणार आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी रांगा लागल्या. दिवसभरात सुमारे 12 हजार पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. रविवारी ही गर्दी अजून वाढल्याने येथील कर्मचाऱ्यांना आवरताना कठीण गेले. पेंग्विन कक्षा जवळ प्रचंड गर्दी होत असल्याने पर्यटकांचा गटा गटाने सोडण्यात आले. मात्र गर्दी वाढतच गेल्याने सुरक्षा रक्षक व् कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. 

पेंग्विनना आकर्षक नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकही त्या नावाने हाका मारत असल्याचे दृश्य दिसून येत होते. पेंग्विन पाहण्यासाठी लहान मुलांपासुन ते वृद्धापर्यंत गर्दी केली होती. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत पेंग्विनचे दर्शन घेता येणार आहे. 31 मार्च पर्यत मोफत व त्यानंतर शुल्क आकारले जाणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget