बी’ विभागातील केशवजी नाईक मार्गावरील ११ मजली अनधिकृत इमारत निष्कासित

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या ‘बी’ विभागातील केशवजी नाईक मार्गावरील ११ मजली अनधिकृत इमारत आज ०७ ऑगस्ट, पासून अतिशय काळजीपूर्वक आजुबाजूच्या परिसरातील इमारतींना व रेल्वे वाहतुकीला कोणत्याही प्रकारची हानी न होता अत्यंत दक्षतेने जमीनदोस्त करण्यात आली.
बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी या प्रकरणामध्ये व्यक्तिशः लक्ष घालून इमारत व कारखाने तसेच विधी खाते यांच्या सहाय्याने म न्यायालयास सदर इमारत ही अनधिकृत असून व पालिकेच्या परवानगीशिवाय बांधली असल्याचे पटवून दिले व स्थगितीचे आदेश रद्द करुन निष्कासन प्रक्रियेला सुरुवात केली.पालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उप आयुक्त (परिमंडळ - १) सुहास करवंदे, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत यांच्या पाठींब्यामुळे सदर कारवाई करणे शक्य झाले.सदर अनधिकृत इमारत ही एकदम दाटीवाटीच्या लोकवस्तीत व बी विभाग संवेदनशील असल्याकारणाने कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता निष्कासन कारवाई करताना विशेष काळजी घेण्यात आली. ८ ऑगस्ट निष्कासनवेळी सदर इमारतीत रहिवासी स्थायिक होते. ठेकेदाराच्या कामगारांच्या मदतीने रहिवाश्यांचे सामान बाहेर काढण्यात आले. सदर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतेही आर्थिक सहाय्य केले नाही. सदर अनधिकृत इमारत ही रेल्वे रुळापासून नजिक असल्याकारणाने कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून बाहेरच्या विभाजक भिंतींचे निष्कासन सुरक्षितपणे पार पाडले. कोणालाही इजा होऊ नये याकरिता परांची, सेप्टी नेट्स बांधणे ही आव्हानात्मक कामे करावी लागल्याने निष्कासन कारवाईस उशीर झाला.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget