मुंबईकरांना मिळणार आता लवकरच पेंग्वीन दर्शन

मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या हम्बोल्ट पेंग्वीन्सना अखेर हक्काचे घर मिळाले असून ७ ते १० दिवसात मुंबईकरांना त्यांचे दर्शनाचा योग येणार आहे.तनी अवस्था पालिका प्रशासनाने केली आहे

मागील वर्षी जुलै महीन्यात आणलेल्या पेग्विंनला मुंबईत आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना तात्पुरत्या म्हणजेच क्वारंटाईन कक्षात ठेवले होते. सोमवारी त्यांना मुख्य कक्षात आणण्यात आले. याधी त्यांना तात्पुरत्या म्हणजेच क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तब्बल १८०० चौरस फुटांच्या जागेत त्यांच्यासाठी ४०० ते ४५० फुट जागेत जलतरवण तलाव बांधण्यात आले असून याठिकाणी दगड, पाणी आणि सर्व वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्याच घरात आल्यासारखे वाटेल,अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. तसेच पेंग्वीन्सच्या देखरेखीसाठी ७ ते १० दिवस डॉक्टरांची टीम तैनात असणार आहे. ही जागा पेंग्वीन्सना कितपत आवडते का, लोकांच्या आवाजाने ते घाबरतात का? जेवण योग्यवेळी घेतात का? त्यांच्या सवयी काय आहेत? याबाबतचा अभ्यास करून मगच त्यांना मुंबईकरांना पाहाण्यासाठी खुले करून दिले जाणार आहे.

चौकट
सकाळी साडेसात वाजता सर्व पेंग्वीन्सना मुख्य कक्षात आणण्यात आले. पाणी आणि दगड पहाताच त्यांनी आनंदाने पाण्यात मोठी डुबकी घेतली. याठिकाणी रेस्टींग, नेस्टींग आणि किचन वगैरे सर्व सोयीसुविधा त्यांच्यासाठी करुन देण्यात आल्या आहेत. तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सियस असून येथे लाईफ सपोर्ट सिस्टीमच्या सहाय्याने कक्षातील पाणी सातत्याने बदलण्यात येणार आहे. जेणेकरून कक्षातील ताजेपणा जिवंत ठेवण्यास मदत होईल, अशी माहिती जीजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget