मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – - मुंबई पालिकेचा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्थायी, सुधार, शिक्षण व बेस्ट समिती पदाच्या समित्यांच्या सदस्यांची घोषणा केली. उर्वरित समित्यांमधील सदस्यांची व नामनिर्देशित सदस्यांची नावे पुढील सभेत घोषित केली जाणार आहे. दरम्यान पालिकेत दुस-या क्रमांकावर असलेल्या भाजपने सत्ताधारी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने विरोधी नेतेपद कुणाला हा पेच कायम राहिला आहे. भाजप नंतर काँग्रेस पक्ष दावा करू शकते मात्र कायद्यातील तरतूदींचा अभ्यास करून जाहीर केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर महाडेश्वर यांनी पक्षांच्या गटनेते पदाची नावे जाहिर केली. यांमध्ये शिवसेनेचे यशवंत जाधव, भाजपच्या गटनेतेपदी मनोज कोटक, काँग्रेसकडून रवी राजा, राष्ट्रवादीकडून राखी जाधव, सपाचे पुन्हा रईस शेख यांच्या नावांची घोषणा केली. मात्र मनसेचे सातही नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याने मनसेच्या गटनेत्याचे नाव घोषित करण्यात आले नाही. येत्या काही दिवसांत उर्वरित समित्यांच्या सदस्य पदांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे महापौर महाडेश्वर यांनी जाहिर केले.

Post a Comment