सरकारकडे असलेली थकबाकी वसूलीकरिता समन्वय समितीला प्राधान्य- महापौर

मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- गेल्या १५ वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी राज्य सरकार व पालिका यांच्या समन्वय समितीला प्राधान्य देवू, असे आश्वासन मुंबईचे नवनिर्विचित महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्यवाहीनी व मुंबईकरांना माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी जैविक औषधाचे धोरण तयार करावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

राज्य शासनाकडे गेल्या अनेर वर्षापासून कोट्यवधीची थकबाकी प्रंबलित आहे. यामुळे काही नियोजित प्रकल्पांना मुर्त स्वरूप देणे पालिकेला आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरते. तसेच सन १९९९ पासूनआजपर्यंत मुंबई महापालिका व राज्य शासन यांच्यामध्ये एकही समन्वय समितीची सभा झालेली नाही. याबाबत आपण पुढाकार घेवून सरकारकडील थकबाकी वसूली करण्याच्या दृष्टीकोणातून समन्वय समितीची सभा आयोजित करण्यास प्राधान्य देवू, अशी घोषणा महाडेश्वर यांनी महापौर पदी निवड झाल्यानंतर केली. तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक उपचार त्वरित मिळावेत, यासाठी मुंबई महापालिकेने विविध भागात आरोग्य वाहिनी तयार करावी. सामान्य जनतेकरिता माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जैविक औषधाबाबतचे धोरण आखण्यात यावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. मुंबई शहर तसेच उपनगरातील पाळीव प्राण्यांना उपचार मिळावेत यासाठी पशु आरोग्य सेवा केंद्र सुरू करणे आवश्यक असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सर्व भागांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हे शहर प्रदुषण मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यास प्राधन्य, बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात झालेल्या आमुलाग्र बदलामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य विकास केंद्र, पर्यावरणाचा असमतोलामुळे दरवर्षीच मुबलक पाऊस पडण्याची शाश्वती कमी असल्याने गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणी जलसंचयन योजना सक्रिय करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget