डॉ आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिनी ड्राय डे घोषित करा - यशवंत जाधव

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिल व महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला ड्राय डे घोषित करा अशी मागणी मुंबई पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित बैठकीत मुंबईचे महापौर व पालिका अधिकाऱ्याना बोलावण्यात आले नसल्याबाबत जाधव पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई महापालिका डॉ. आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे सोयी सुविधा पुरवत असते. यासाठी महापालिका बजट मध्ये 1 कोटी रुपयांची तरतूद करते. महापालिकेकडून खर्च केला जात असताना 14 एप्रिल जयंतीच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यानी 20 मार्चला फ़क्त समन्वय समितीला घेवुन बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबईच्या महापौर व इतराना बोलावण्यात आले नसल्याने जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.चैत्यभूमीचे सुशोभिकरण महापालिकेने केले आहे त्या महापालिकेला व चैत्यभूमीचे व्यवस्थापन करणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेलाही या बैठकीत डावलल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनी ड्राय डे घोषित करावा म्हणून कित्तेक संघटना व्यक्ती सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने 14 एप्रिल व 6 डिसेंबर या दोन्ही दिवशी ड्राय डे घोषित करावा या मागणीसाठी शिवसेना विधानभवनातही आक्रामक पवित्रा घेईल असे जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget