राणीच्या बागेत महापौर निवासाला र-थायी समिती अध्यक्षाचा विरोध

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – अरबी समुद्राच्या कडेला आणि गजबजलेल्या शिवाजीपार्क मधील महापौर निवासाच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे दिड कोटी जनतेचे नागरीक असलेल्या महापौरांचे निवास आता राणीबागेत बनवले जाणार आहे. परंतु राणीबागेतील महापौरांच्या निवासस्थानासाठी असलेली वास्तू आणि तेथील सायलेन्स झोन यामुळे या पर्यायी निवासस्थानाला स्थायी समिती अध्यक्षांनी विरोध केला आहे. महापौरांचे निवासस्थान हे राणीबागेऐवजी पेडररोडमधील महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानात बनवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका सभागृहाची मान्यता दिली आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थानात हे आता स्मारकासाठी रिकामं करून द्यायचे असून नवीन महापौरांना आता नव्या महापौर निवासस्थानात राहायला जावे लागणार आहे. नव्या महापौरांसाठी राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा निवास असलेल्या जागेत महापौर निवासस्थान बनवण्याचे जवळपास निश्चित केले आहे. राणीबागेतील या नव्या महापौर निवासाच्या वास्तूची पाहणी स्थायी समिती अध्यक्षांसह सद्स्यांनी केली आहे. परंतु राणीबागेतील या नव्या महापौर निवासाची जागाच अपुरी असल्यामुळे यावर समिती अध्यक्षांनी नापसंती व्यक्त केली आहे.राणीबागेतील महापौर निवासासाठी निश्चित केलेली जागा फारच छोटी आहे. विशेष म्हणजे राणीबागेत शांतता क्षेत्र आहे. महापौरांकडे पाहुण्यांची ये- जा असते. तसेच त्याठिकाणी कार्यक्रमही केले जातात. परंतु शांतता क्षेत्र असल्यामुळे तिथे कार्यक्रम करता येणार नाही. त्यातच महापौरपदाला साजेशी अशी प्रशस्त जागा नसल्यामुळे राणीबागेतील महापौर निवासाबाबत आपण समाधानी नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी म्हटले आहे. राणीबागेऐवजी पेडर रोडवरील महापालिका आयुक्तांचे निवासस्थान हे महापौर निवास म्हणून दिले जावे,अशी मागणी फणसे यांनी केली आहे. महापालिका सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महापौरांचे निवासस्थान राणीबागेऐवजी पेडररोडवरील महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचे निवास असलेल्या जागेत बनवण्यात यावे, अशी सूचना केली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget