मुंबई, बुधवार(प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेच्या महापौर पद निवडणुकीची ९ मार्च तारीख ठरवलेली असताना, अचानक ८ मार्च का करण्यात आली याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या. शिवसेनेतर जोरदार आक्षेप नोंदवत पालिकेच्या या कृतीचा निषेध केला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यावर तारीख बदलण्यासाठी दबाव टाकला असा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. मात्र भाजपने एकाचवेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर मात केल्याची खेळी खेळल्याचे या निमित्ताने बोलले जाते.
८ मार्चला उत्तरप्रदेशात मतदान होत आहे. याच दिवशी मुंबईत शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो असे गणित या मागे आहे. याचा परिणाम उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मतांवर होईल, असा भाजपचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपकडून आयुक्तांवर दबाव टाकून मुदतीपूर्वीच महापौरपदाची निवडणूक जाहीर करण्याचा घाट घेतला गेला असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची पंचायत? उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. तेथे दोन्हीं पक्षांनी मदार अल्पसंख्याक मतदारांवर आहे. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. आजवर मुंबई महापालिकेत समाजवादी पक्ष महापौर पदासाठी पाठिंबा द्यायचे. तर यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस आणि सपा शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. परंतु, ८ मार्च ही तारीख घोषित झाल्याने पाठिंबा द्यायचा कसा, असा प्रश्न या पक्षांना पडला आहे. तसे केल्यास भाषिक आणि अल्पसख्याक मते विरोधात जाण्याची भीती या पक्षांना आहे. म्हणूनच त्यांची पंचायत झाली आहे.
पालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना – ८४+ ४ अपक्ष
भाजप – ८२
काँग्रेस – ३१
राष्ट्रवादी – ०९
मनसे – ०७
एमआयएम – ०२
सपा – ०६
अखिल भारतीय सेना – ०१
Post a Comment