बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पालिकेचा कृती आरखडा

येत्या बुधवारी आराखड्याला मंजूरी मिळणार
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला सततच्या तोटयातून बाहेर काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बेस्टला तोट्यातून काढ़ण्यासाठी पालिका आता पुढे आली आहे. बेस्टला वाचवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आरखड्याला येत्या बुधवारी 29 मार्चला मंजूरी मिळणार आहे.

बेस्ट उपक्रम सतत घाटयात चालला आहे. बेस्टने मुंबई महापालिकेबरोबर विविध बँकाची कर्ज घेतली आहेत. बेस्टने घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी द्यावयाचा रक्कमेमुले बेस्ट कर्मचाऱ्याना पगार वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली. बेस्ट कर्मचारी संतप्त झाल्याची दखल पालिका प्रशासनाला घ्यावी लागली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पालिका गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून बेस्टला कर्जातुन बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिका बेस्टला एक हजार कोटी रुपयांचा मदतीचा हात देणार आहे. तोट्यातील एसी बसगाड्या कायमच्या बंद करण्याचा विचार करण्यात आला आहे असे कृति आराखडयात म्हटले आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत आराखडा सादर करण्यात आला असून बेस्टला वाचवण्यावर सर्व पक्षीय गट नेत्यांची मत झाले आहे. बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत आराखड्याला मंजूरी दिली जाणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget